OUR BLOG

अर्श (मूळव्याध) आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून

आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराचे मूळ कारण हे रुग्णाचा चुकीचा आहार, चुकीचा विहार हेच असते. अनेक रोगांचे मूळ कारण हे त्या रुग्णाच्या पचनाशी निगडित असते.

अशाच अनेक पचनाशी निगडित व्याधींपैकी एक आजार मूळव्याध आहे. मूळव्याधीचे दोन प्रकार असतात -पाहिला शुष्क अर्श (कोरडी मूळव्याध) आणि दुसरा रक्तज अर्श (रक्तज मूळव्याध).

१. शुष्क अर्श यामध्ये फक्त शौचाच्या ठिकाणी वेदना, कोंबा मध्ये सूज, खाज असते. रक्त पडणे हा प्रकार नसतो.

२. रक्तज अर्श यामध्ये सूज, वेदना, खाज याबरोबरच शौचाच्या ठिकाणी रक्त पडणे (bleeding) असते.

           अशा परिस्थितीत रुग्ण चिंतातुर असतो, आणि नाईलाजास्तव रुग्ण इतर पॅथीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑपरेशन किंवा शल्य कर्म करण्यास भाग पडतो.

           पण मित्रांनो, खरे सांगू? मघाशी सांगितल्या प्रमाणे मूळव्याध हा आजार पचनाशी निगडित आहे आणि ऑपरेशन शौचाच्या ठिकाणी असणाऱ्या कोंबाचे केले जाते! आहे की नाही हास्यास्पद.

          गेल्या १५ वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये असे मूळव्याधीचे शेकडो रुग्ण माझ्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन पूर्ण बरे झाल्याचे दाखले आहेत.

          आयुर्वेदानुसार तिखट, तेलकट, खारट, आंबट, आंबवलेले, तळलेले, शिळे अन्न, अति मांसाहार, दुपारची झोप, रात्रीचे जागरण, सतत एका ठिकाणी बसुन राहणे, उष्णतेच्या जवळ काम करणे, या गोष्टींमुळे वात व पित्त दोष प्रकुपित होतात. अशा प्रकुपित वात आणि पित्तामूळे शौचास खडा होणे, खूप गॅसेसचा त्रास होणे आणि शौचाच्या जागेतून मूळव्याधीच्या कोंब मधुन सूज येऊन वेदना, खाज याबरोबरच haemorroidal veins मधुन ब्लीडिंग होणे, असे प्रकार होतात.

अशा वेळेस वात आणि पित्त यांचे शमन करणारी, सौम्य विरेचक आयुर्वेदिक औषधी दिली असता, गुण येतो.

अधोग रक्तपित्त असेही निदान बऱ्याच वेळा करून आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाला अगदी from day one results मिळतात आणि रुग्णाचाही आपल्या महान आयुर्वेदशास्त्रावर दृढ विश्वास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

वी. टीप –

१. पथ्य पाळणे आवश्यक.

२. आपणास असा त्रास असेल तर सर्जरी करण्याअगोदर नक्कीच जवळच्या तज्ञ वैद्यांचा सल्ला व उपचार घ्या.2017-09-06 16:54:06 manasee@eyecatchers.co