OUR BLOG

शरद ऋतुचर्या

4 tips to follow post fistula treatment

( सप्टेंबर  - ऑक्टोबर ) - ( अश्विन - कार्तिक )

         शरद ऋतुमध्ये अचानक वाढलेला सुर्यताप व वर्षा ऋतुमध्ये संचित झालेले पित्त हे प्रकुपित होते. त्यामुळे पित्ताचे वेगवेगळे आजार शरद ऋतुमध्ये होतात.

 

आहार:-

1) जुने तांदूळ, जव, लाल तांदूळ खावे.

2) कडू, गोड, व तुरट चवीचे पदार्थ खावे.

3) कडू घृत ( तूप ) खावे.

4) कोबी, कारले, भेंडी, बटाटा, सूरण यांसारख्या फळभाज्या खाव्या.

5) मूग, मसूर, मटकी, वाल ही कडधान्ये खावी.

6) पालक, मेथी, चवळी, लाल माठ ह्या पालेभाज्या खाव्या.

7) द्राक्षे, आवळा, केळे, डाळिंब, सफरचंद इ. फळे खावी.

 

विहार:-

1) माठातले पाणी प्यावे.

2) चंदन, कापूर, खस ह्यांचा लेप लावावा.

3) चंदन, वाळा यांनी सिद्ध केलेले पाणी प्यावे.

4) रात्रीच्या वेळी चांदण्यांच्या प्रकाशात बसावे.

 

अपथ्य:-

1) खारट पदार्थ खाणे.

2) पोटभर जेवणे.

3) दही, तेल खाणे ( अतिप्रमाणात )

4) उन्हात फिरणे.

5) तीक्ष्ण मद्य पिणे.

6) दिवसा झोपणे.

 

पंचकर्म:-

विरेचन व रक्तमोक्षण.2017-09-12 17:08:45 manasee@eyecatchers.co